आजचा कोरोना अपडेट....

Foto
औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत १६५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण ११११ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज १०७ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ९३२ वर गेली आहे. 
आज दिवसभरात १०७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ६३ पुरुष, ४४ महिला रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९३२ वर गेली आहे. त्यापैकी १६५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ११११ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 
आतापर्यंत १६५८ जण कोरोनामुक्त 
आज दिवसभरात १०७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १६५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ११११ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 
घाटीत चार, खासगीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू 
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित असलेल्या मुकुंदवाडी येथील विश्रांती नगरातील ३५वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. तर रोझाबाग येथील ५५ वर्षीय पुरूष, इटखेडा येथील ७५ वर्षीय स्त्री रुग्ण, हर्षनगरातील ४९ वर्षीय स्त्री रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शहरातील एका खासगी रुग्णालयात बेगमपुऱ्यातील ७८ वर्षीय स्त्री रुग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत १२०, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ४२, मिनी घाटीमध्ये १ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण १६३ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या भागातील आढळले १०७ रुग्ण
मुकुंदवाडी-१, कैसर कॉलनी -१, बेगमपुरा २, चेलीपुरा-१, उस्मानपुरा-१ रेहमानिया कॉलनी-१, ईटखेडा -२, चिखलठाणा -४, वैजापूर-१, गारखेडा परिसर-५, खोकडपुरा -१, न्यु विशाल नगर-१, बायजीपुरा -१, आंबेडकर नगर-२, बंजारा कॉलनी-२, एस.टी. कॉलनी-१, एन-नऊ सिडको -३, पुंडलिक नगर-३, छत्रपती नगर -२ , जिन्सी राजा बाजार-२, शहानुरवाडी-११, जवाहर कॉलनी -११, जालान नगर-१, वडजे रेसिडेन्सी -१, सिल्क मिल कॉलनी-१, शिवाजीनगर-२, रोजा बाग दिल्ली गेट-२, बन्सीलाल नगर-१, बालाजी नगर -१, भाग्यनगर-३, कोहिनुर कॉलनी-१, एन-अकरा सिडको-३, जयभवानी नगर -१, गादीया विहार-२, दिवानदेवडी -१, सिडको-१, वाहेगाव-१, एन-अकरा, टिव्ही सेंटर -१, शांतीपुरा, छावणी-१, रहिम नगर-१, प्रकाश नगर-१, बुध्द नगर-१, हडको, टिव्ही सेंटर-१, सुधाकर नगर -१, न्यु हनुमान नगर -१, दुधड-१, कानडगाव, ता. कन्नड-१ , देवगाव रंगारी-१, लक्ष्मीनगर-१, वाळूज-१, वडगाव कोल्हाटी, वाळूज-१, चिकलठाणा -१, जयभीम नगर-१, पैठण गेट-१, जुना बाजार-१, सेव्हन हिल, विद्या नगर-१, फत्ती मैदान, फुलंब्री -१, तेली गल्ली, फुलंब्री -१, न्यू बायजीपुरा, इंदिरा नगर -१, इतर-४ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ६३ पुरूष आणि ४४ महिला रुग्णांचा समावेश आहे.